Malgund : मालगुंडमध्ये श्रावणधारा उपक्रमाचा ‘बहर वर्षा ऋतु’ कार्यक्रमाने समारोप

गणपतीपुळे : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसूत स्मारक मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसूत स्मारक मालगुंड येथे दरवर्षी श्रावणधारा हा उपक्रम राबवण्यात येतो. त्यानुसार यावर्षी या उपक्रमाची सुरुवात मालगुंड येथील डॉ. संतोष केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहर वर्षाऋतुचा’ या कार्यक्रमाने करण्यात आली.

या कार्यक्रमाला कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, कवी केशवसुत स्मारक समितीचे कोषाध्यक्ष तथा कोमसाप मालगुंड शाखेचे सदस्य रवींद्र उर्फ भाऊ मेहेंदळे, सदस्या उज्ज्वला बापट,यांच्यासह शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, कवी आणि साहित्यप्रेमी रसिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

निवेदन विलास राणे यांनी तर आभार रामानंद लिमये यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभदा मुळ्ये, विलास राणे, रामानंद लिमये, युवाशक्ती दक्षिण कोकण विभागप्रमुख अरुण मोर्ये, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, अदिती मांडवकर यांनीही विशेष प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 28-Aug-2025