रत्नागिरी : शहरातील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ यांचा शताब्दी महोत्सव २०२५ मध्ये भव्यतेने साजरा होत आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गणपती बाप्पाच्या भव्य आगमन सोहळ्याने या ऐतिहासिक उत्सवाची सुरुवात झाली.या महोत्सवात भक्ती, कला आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळणार आहे. बुधवारी पहाटे प्राणप्रतिष्ठा झाली असून, त्यानंतर भक्तिगीत आणि राधा भट यांचा संगीत कार्यक्रम रंगला.
तसेच २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री आरती, मंत्रपुष्प आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विनोदी नाट्यप्रयोग (छूमंतर, यु आर ग्रेट पप्पा), संगीत मैफल (तो राजहंस एक श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली), कराओंके स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, भजन संध्याआणि आदिती पाटवर्धन, सीमंतिनी कर्मकार यांचे विशेष सादरीकरण यांचा समावेश आहे.
६ सप्टेंबर रोजी सकाळी सहस्रावर्तन आणि रात्री पारितोषिक वितरण, तर ७ सप्टेंबर रोजी उत्तरपूजा आणि विसर्जन मिरवणूक होणार आहे. याशिवाय, १० ऑगस्ट रोजी बालक मंदिर येथे रक्तदान शिविर व ९ सप्टेंबर रोजी उत्सव मंडपात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 28-Aug-2025














