रत्नागिरी : महाराष्ट्र परिवहन राज्य महामंडळाच्या वतीने लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात आली. या सवलीतचा लाभ कोकणातील ज्येष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतला असून त्याला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सात महिन्यात आषाढी, गणेशोत्सव, दररोजचा प्रवास असे मिळून तब्बल दीड कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणीनी घेतला आहे. सवलतीमुळे रत्नागिरी विभागाला चांगले उत्पत्र मिळाल्यामुळे लालपरीला अच्छे दिन आले आहेत.
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी ७५ वर्षावरील नागरिकांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत तर ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या एसटी बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलाची गर्दी वाढली सवलतीचा लाभ जिल्ह्यातील महिला, तरुणी व ज्येष्ठ नागरिक घेतला. त्यामुळे एसटीलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. मागील तीन वर्षात लालपरी ही महिला, ज्येष्ठ नागरिकांची आधार बनली आहे.
‘हे’ पुरावे ग्राह्य धरतात
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, केंद्र व राज्यशासनामार्फत निर्गमित केलेले एक ओळखपत्र वाहकाला दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देवून मोफत प्रवास करता येतो.
ज्येष्ठ नागरिकसह महिला, तरूणींनी सवलतीचा लाभ घेत आहेत. त्यामुळे एसटी बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी बाढू लागली आहे. गणेशोत्सवात व आषाढी बारीत ही ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणींनी सवलतीचा लाभ घेतला आहे.
प्रजेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
लालपरीतून महिला, तरुणींचा सर्वाधिक प्रवास
एस.टी. बसमधून प्रवासासाठी महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिला, तरुणी या एसटी बसमधूनच प्रवास करीत आहेत. वाट पाहीन पण लालपरीतूनच प्रवास करणार, यामुळे महिलांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सात महिन्यांत ७० ते ८० लाख महिलांनी प्रवास केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:17 PM 28-Aug-2025














