रत्नागिरी : जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना याबाबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे दकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
योजनेचे लाभ
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत
१३५६ उपचार व शस्त्रक्रिया यासाठी कव्हरेज.
प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपये इतके आरोग्य संरक्षण.
२३०० पेक्षा जास्त शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचाराची सुविधा.
आयुष्यमान वयवंदना योजनेत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ५ लाख रुपये लाभ.
ई-केवायसी व कार्ड निर्मिती
या योजनांचा लाभ कुटुंब आधारित असल्याने रेशन कार्ड व आधार कार्डच्या आधारे ई-केवायसी करणे आवश्यक.
लाभार्थी स्वतः https://beneficiary.nhea.gov.in या पोर्टल/अॅपवर लॉगिन करून आपले आयुष्यमान कार्ड तयार करू शकतात.
सर्व आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थ्यांची कार्डे तयार करून पूर्ण करणे अपेक्षित.
स्थानिक सहभागाचे आवाहन
या मोहिमेत ग्रामपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकान चालक, आरोग्यमित्र, सरपंच, शासकीय अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ व स्वयंसेवी संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देवेंद्र सिंह यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:42 PM 28-Aug-2025














