साखरपा : गणेशोत्सवात प्रत्येक कलाकार आपआपल्या कला सादर करत त्यातून गणेश वंदना साकार करतात. कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील युवा चित्रकार सागर जाधव हे अशांपैकीच एक. त्यांनी विविध माध्यमात गणेश चित्रे साकारली आहेत.
सागर यांनी देवरूख महाविद्यालयातून मराठी विषयातून पदवी घेतली. सध्या ते चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील विद्यालयात बीएफएचे शिक्षण घेत आहेत. त्यांची काही चित्रे विद्यार्थी प्रदर्शक या संस्थेतर्फे ऑनलाइन चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात समाविष्ट करण्यात आली होती. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्रथितयश चित्रकारांची चित्रे त्यात ऑनलाइन सहभागी करण्यात आली होती. त्यात सागर यांच्या पाच चित्रांचा समावेश होता. त्यातील एक चित्र अमेरिकेत विकले गेले होते.
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात गणेशाची रुपे विविध माध्यमांवर चितारत त्यांचा आविष्कार आपल्या कलेतून दाखवण्याचा प्रयत्न चित्रकार सागर जाधव यांनी केला आहे.
ऑईल पेपरसह कागदाचा वापर
सागर यांनी पोर्ट्रेटच्या माध्यमातून गणेश रुपे साकारली आहेत. त्यात त्यांनी विविध रंगांचा विविध माध्यमांवर वापर करून ही चित्रे काढली आहेत. ऑइल पेंटचा वापर करत ऑइल पेपरवर, पोस्टर कलरचा वापर करत कागदावर ही चित्रे साकारली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 02-Sep-2025














