Ratnagiri : आजारी तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : तापाने आजारी असलेल्या तरुणाला खासगी दवाखान्यात उपचार घेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यश प्रकाश आखाडे (वय २२, रा. उद्यमनगर, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.३१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश आखाडे याला दोन दिवस ताप येत होता. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 02-Sep-2025