Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजना; रत्नागिरी तालुक्यासाठी समिती स्थापन

रत्नागिरी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत प्राप्त होणारे अर्ज छाननी करुन निर्णय घेण्यासाठी रत्नागिरी तालुका पातळी संजय गांधी निराधार समिती स्थापन करण्यात आली आहे.

पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती स्वप्नील मयेकर, मु.पो. कोतवडे हे या समितीचे अध्यक्ष असून मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी सुनिल जाधव, वाटद, महिला अशासकीय प्रतिनिधी अपर्णा बोरकर, मु.पो. पानवल, इतर मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी नामदेव चौघुले, मु. गडनरळ, पो. कोळीसरे, रुपेश पेडणेकर, शिवाजीनगर, रत्नागिरी, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी मिलींद खानविलकर, मु.पो. उक्षी, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी श्रीकांत राऊत, मु.पो. पाली, संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी सुशांत पाटकर, मु. दाभिळ अंबेरे यांची निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 02-Sep-2025