Sangameshwar : गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणीशी असभ्य वर्तन; तरुणाविरोधात गुन्हा

संगमेश्वर : गणेशोत्सवासाठी गावात आलेल्या एका तरुणीशी गैरवर्तन झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना संदीप जानू खडसडे याने तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. ही घटना जिल्ह्यातील एका गावात रविवारी (ता. ३१ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली.

पीडितेच्या मैत्रिणीने जेव्हा या वर्तनाबाबत संशयिताला जाब विचारण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा संदीप खडसडे याने तिच्यावर, तिच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली आणि लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले, अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडितेच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात संदीप खडसडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 02-Sep-2025