रत्नागिरी : स्टील कटिंगचे वायडींग वायर कटिंग करत असताना शॉक लागून कामगार बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रामचंद्र गयाप्रसाद पासवन (वय २७, रा. सध्या महिला वसतिगृह, गोगटे कॉलेजजवळ, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माहिती देणारे कुंदन उत्तम मगर हे इंजिनिअर आहेत. जून २०२४ पासून गोगटे कॉलेज रत्नागिरी येथील आवारातील इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रामचंद्र पासवन हा इतर कामगारांसमवेत स्टील कटिंग मशिनने वायडींग वायर कटिंग करत असताना त्याच्या पायाला शॉक लागून तो बेशुद्ध पडला.
कुंदन मगर यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 02-Sep-2025














