Ratnagiri Ganpati Visarjan : २, ४, ६ व ७ सप्टेंबर रोजी वाहतूक मार्गात बदल

रत्नागिरी : मंगळवार २ सप्टेंबर रोजी गौरी गणपती, ४ सप्टेंबर रोजी ९ दिवसांचे गणपती, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका-गोखले नाका – विठ्ठल मंदिर-काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

रामनाका-तेलीअळी नाका – आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय-मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरु राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे. नागरिकांनी याबाबत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 02-Sep-2025