mandangad : किल्ले मंडणगड व बस स्थानक परिसरात वृक्षारोपण

मंडणगड : शाहू फाऊंडेशन, मंडणगड या संस्थेच्या वतीने किल्ले मंडणगड व शहरातील बस स्थानक परिसरात २९ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या ३०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमास यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, नगरसेवक आदेश मर्चेंडे, बसपा जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चेंडे, वनअधिकारी श्री. झाडे, मोहन मर्चेंडे, सुरेश मर्चेंडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. अभंग, शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश मर्चडे, सचिव चंद्रसेन मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी मनोगत व्यक्त करताना वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीशी सबंधित असलेला महत्वपूर्ण ग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 02-Sep-2025