चिपळूण : चिपळूण शहर आणि मुंबई-गोवा महामार्गावर होणारे रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेंतर्गत लोटे आणि चिपळूण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी एकाच संस्कार दिवशी ५२ हजार ७०० रुपयांचा दंड केशव वसूल करण्यात आला. लोटे, बहादूरशेख ढे काही नाका, कापसाळ, पेढांबे, कामथे, सावर्डे निधनाची या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. बा घरी विनापरवा वाहन चालवणे, दुचाकीवर विनायक हेल्मेटचा वापर टाळणे, चारचाकी यांनी वाहनांमध्ये सीटबेल्टच्या वापराकडे व प्रयत्न दुर्लक्ष, वाहनांच्या कागदपत्रांचा अभाव, वाहनाचा विमा तसेच वाहतुकीदरम्यान मोबाइलचा वापर केल्या प्रकरणी केलेल्या कारवाईत ९१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे .
जनजागृतीवर भर
वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम तसेच गस्त घालून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमानांचा प्रवास सुखरूप झाला. किरकोळ अपघात वगळता मोठे अपघात झाले नाही. आम्ही वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच अपघात होणार नाही याची काळजी घेतली होती. चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी आम्ही जागोजागी बंदोबस्त ठेवणार आहोत- अनंत पवार,साहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा लोटे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 02-Sep-2025














