Lanja: कोकणातील पालखी उत्सवाचा देखावा

पावस : लांजा तालुक्यातील शेळवीवाडी (हर्चे) येथील तोडणकर परिवारातील हर्षद तोडणकर यांनी घरगुती गणपती सजावटीत कोकणातील पालखी उत्सवाचा देखावा तयार केला आहे.

एक झाड, आईच्या नावे हा संदेश या देखाव्यातून दिला आहे. यामध्ये प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहनही केले आहे. गणेशोत्सवातील या देखाव्यातून पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी दिला आहे. तसेच मराठी भाषा गौरव व संवर्धन यावरही त्यांनी मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी पुठ्ठा, कागद यांचा वापर केला आहे. या संकल्पनेतून समाज जागृतीचा प्रयत्न त्यांनी केला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 02-09-2025

Naadi pariksha