MEMU train: चिपळूण-पनवेल मार्गावर ३-४ सप्टेंबरला अनारक्षित विशेष मेमू

रत्नागिरी : MEMU train: गणेशोत्सव काळात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण-पनवेल-चिपळूण दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या बुधवार, ३ सप्टेंबर आणि गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी धावणार आहेत.

चिपळूण-पनवेल मेमू (गाडी क्रमांक 01160) सकाळी ११.०५ वाजता चिपळूणहून सुटेल आणि दुपारी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल-चिपळूण मेमू (गाडी क्रमांक 01159) सायंकाळी ४.४० वाजता पनवेलहून सुटून त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.

ही विशेष मेमू गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबणार आहे.

Tata tiago

एकूण ८ कोच असलेली ही गाडी प्रवाशांसाठी सोयीची ठरणार असून, गणेशोत्सव काळात प्रवासाचा ताण कमी करण्यास मदत होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 02-09-2025