रत्नागिरी : जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, यावर जनजागृती व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कुर्णे-पडियेवाडी (ता. लांजा) येथील तेजस गणपती पडिये याने कोकणातील महावृक्षाचा सुंदर देखावा साकारला आहे. तेजस पडिये कुर्णे गावातील शेतकरी आहे. जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यावर काहीतरी करावे यासाठी गणेशोत्सवात सलग तीन वर्षे त्याने पर्यावरणावर आधारित देखावा तयार करत आहे. शेतीनंतर गणेशोत्सवातील देखाव्याची तेजस तयारी करतो.
टाकाऊपासून टिकाऊ यावर त्याचा भर असतो. गेली दोन वर्ष त्याने कातळ, त्यावर उगवणारे विविध प्रकारची रान असा देखावा त्याने साकारला होता. यावर्षी त्याने प्लास्टर, गोणपाट, टाकाऊ लाकूड, कागद आदी साहित्याचा वापर करून अगदी सह्याद्रीत वाढणाऱ्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या महावृक्ष प्रतीकात्मक देखावा तयार केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:40 PM 02-Sep-2025












