Uniform Civil Code Public Hearing Ratnagiri: समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची जनसुनावणी; रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार

Uniform Civil Code Public Hearing Ratnagiri: समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची जनसुनावणी; रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार

कोकण भवन नवी मुंबईत समक्ष, तर जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवता येणार मते; ऑनलाइन पोर्टलचीही सुविधा उपलब्ध

रत्नागिरी: समान नागरी कायद्याबाबत (UCC) विविध हितसंबंधी गट, सामाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी राज्य शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे कोकण विभागाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे (Uniform Civil Code public hearing Ratnagiri). ही जनसुनावणी २१ व २२ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे पार पडणार असून, रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त (कोकण विभाग) रुबल अग्रवाल यांच्यामार्फत कोकण विभागातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण जनसुनावणीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

जनसुनावणीत सहभागी होण्याची प्रक्रिया आणि स्वरूप
नागरिक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली आहे:

Horizon techno.

उपस्थितीची वेळ आणि ठिकाण: संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय (समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई) किंवा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी, निर्धारित वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहता येईल.

समक्ष आणि व्हीसीद्वारे (VC) सुनावणी: नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल, तर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) घेण्यात येणार आहे.

ऑनलाइन मत नोंदणी सुविधा: ज्या नागरिकांना प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे उपस्थित न राहता केवळ ऑनलाइन पद्धतीने आपले मत सादर करावयाचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या [ucc.maharashtra.gov.in
https://ucc.maharashtra.gov.in/](https://ucc.maharashtra.gov.in/)
या अधिकृत पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या आधारे आपली माहिती व मते नोंदविता येतील, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.