Guhagar : मनसेच्या दणक्याने शृंगारतळीतील खड्डे बुजवले

गुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रृंगारतळी बाजारपेठेतील फुल मार्केट या ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी तत्काळ न भरल्यास गुहागर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी खड्डयात वृक्षारोपण करण्याचा इशारा दिला होता. अखेर मनसेच्या या दणक्यानंतर सदरचे खड्डे तत्काळ भरण्यात आले.

या ठिकाणाहून प्रवास करताना वाहन चालकांसह प्रवासी व नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गणेशोत्सव दरम्यान श्रृंगारतळी बाजारपेठ मध्ये हजारो ग्राहक येत असतात परंतु पूल मार्केट येथील रस्त्यावर पडलेले खड्डे सर्वांनाच मनस्ताप सहन करणारे ठरत होते. अखेर शेवटी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवरकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर व अन्य पदाधिकारी यांनी दोन दिवसात खड्डे न भरल्यास वृक्षारोपण करू असा इशारा अधिकाऱ्यांना दिला होता, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या “मनसे” दणक्याने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्री खुणेकर यांनी सदरचे खड्डे तात्काळ भरल्याने मनसेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:52 PM 02-Sep-2025