Ganpati Visarjan : संगमेश्वर तालुक्यात १९ हजार ९३५ गौरी-गणपतींचे विसर्जन

देवरुख : ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात संगमेश्वर 5 तालुक्यातील १९ हजार ९३५ गौरी गणपतींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने विसर्जनासाठी कोणालाही नदीत न उतरु देता कार्यकर्त्यांनी गणपती विसर्जन करून सहकार्य केले.

गेले तीन दिवस जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना मोठा पूर आला होता. । यामुळे ग्रामपंचायात, नगरपंचायात, पोलीस यंत्रणा व सामाजिक । संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये सर्वसामान्यांना गणेश विसर्जनाला अटकाव केला. देवरुखमध्ये नदी तसेच शाळेजवळ व नगरपंचयात येथे कृत्रिम विसर्जन घाट उभारले होते.

याचबरोबर विसर्जन घाटावर निर्माल्य कलश उभारण्यात आले. यात भक्तांनी निर्माल्य टाकून सहकार्य केले. ग्रामीण भागात ढोल-ताशे तसेच शहरी भागात बेंजो, डीजे, ढोल पथक या वाजंत्रीसह व फटाक्यांची आतषबाजी करत लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला. तालुक्यातील सोनवी, गडघडी, गडनदी, शात्री, अलकनंदा, सप्तालिंगी, बावनदी, काजळी अशा प्रमुख नद्यांमध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. नद्यांना पूर आल्याने लाईफ जॅकेट घालून राजू काकडे अॅकॅडमीचे कार्यकर्ते बाप्पाचे विसर्जन करत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी मिरवणूक मार्गांवर व नदीपत्रालगत बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. भक्तांनी डोक्यावरून, हातगाडी, टेम्पो, चारचाकी अशांमधून लाडक्या बाप्पाला मिरवणुकीने वाजतगाजत विसर्जन स्थळी नेले. यावेळी अनेक भाविक गणपती बाप्पाच्या गाण्यावर नाचत बाप्पाची आळवणी करत पुढच्या वर्षी लवकर येण्याची हाक देत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 03-Sep-2025