Ratnagiri : बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप नियुक्तीपत्राशिवाय नाही!

रत्नागिरी : मंडळाचे गृहोपयोगी वस्तू संच वितरणाचे http://hikit.mahabocw.in/appointmen t या संकेतस्थळाचा वापर करून गृहोपयोगी संच घेण्याकरिता त्याच्या सोईचा दिनांक व तालुकानिहाय वितरण केंद्र निवडण्यात यावा. तसेच संकेतस्थळावरून नियुक्ती पत्र घेण्यात यावे. नियुक्ती पत्राशिवाय वितरण केंद्रावरून कोणालाही संच वाटप होणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.

गृहोपयोगी वस्तू संच वितरणाची कार्यपद्धतीमध्ये बदल करून सुधारीत कार्यपद्धतीस शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. सुधारीत पद्धतीनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. मुंबई या नियुक्त संस्थेच्या तालुकानिहाय वितरण केंद्रांवर गृहोपयोगी संचाचे वितरण करण्यात येईल. गृहोपयोगी संच हा कुटुंबा (पती/पत्नी) करिता एकच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच संबंधिताने यापूर्वीच गृहोपयोगी संच घेतला असेल, तर तो या योजनेस अपात्र ठरेल. बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र, आधार कार्ड व संकेतस्थळावरून मिळालेले नियुक्तीपत्र घेऊन त्याने निवडलेल्या दिनांकास वितरण केंद्रावर येऊन संच ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 03-Sep-2025