खेड : तालुक्यात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गौरी-गणपतीचे विर्सजन खेडमधील जगबुडी व नांरगी नदीच्या विर्सजन घाटावर मोठ्या उत्साहात पार पडले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. त्यानंतर गौरी-गणपती विसर्जन खेडमध्ये पार पडले. खेडमधील १०५८० गणेश मूर्तीचे व ५५५० गौरीचे विसर्जन येथील जगबुडी व नारंगी नदीच्या विर्सजन घाटावर झाले, तर यावेळी शहरातील मुरलीमनोहर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसह आणखी पाच सार्वजनिक गणपतीचे विर्सजन करण्यात आले. विर्सजनासाठी दोन्ही नद्यांच्या विर्सजन घाटावर नागरिकांनी गर्दी केली होती. हा विर्सजन सोहळा शांततेत व शिस्तद्ध पार पडला.
सकाळपासूनच पावसाची रिमझीम सुरूच होती. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला विर्सजन घाटावर घेऊन जाताना फारच कसरत करावी लागली. आपल्या लाडक्या देवतेची सेवा करून त्यांची मनोभावे आराधना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आज खेडमधील शेकडो भक्तगणांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 03-Sep-2025










