चिपळूण : तालुक्यातील तुरंबव फाटा येथे चारचाकीला मोटारसायकलने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या रिया निलेश नाचरे (१६, रा. निवळी लाखणवाडी) या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचे वडील नीलेश नाचरे यांच्यावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा अपघात दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुरंबव फाटा येथे घडला. या बाबतची फिर्याद प्रशांत कृष्णाजी पंडित (५०, रा. तुरंबव सहाणवाडी) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिली आहे. प्रशांत पंडित हे आपल्या ताब्यातील गाडी घेऊन मांडकी ते तुरंबव असे जात होते. तुरंबव फाटा येथे त्यांची गाडी आली असता समोरून भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल थेट येऊन चारचाकीला जोरदार धडकली. यात रिया निलेश नाचरे हिचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 06-Sep-2025












