Mumbai-goa highway : महामार्गावरील अवजड वाहतूक 8 सप्टेंबरपासून होणार पूर्ववत

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे.

गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील वाढत्या गर्दीमुळे, विशेषतः रेखचौपदरीकरण झालेल्या महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण होत होती. त्याचा त्रास गणेशभक्तांना व सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही ताण येत होता.

या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. ६ सप्टेंबर रोजी ११ दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गणेशोत्सवाची सांगता होत असल्याने आता वाहतूक सुरळीत करण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ८ सप्टेंबर रात्रीपासून महामार्गावर अवजड वाहतूक सुरू होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 06-Sep-2025