BJP : संगमेश्वरात आज भाजपाची महत्त्वाची बैठक

देवरुख : संगमेश्वर तालुका भाजपाच्या वतीने १२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता सुशासन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर संपूर्ण मंडलाची महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक गोळवली येथे गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प येथे आयोजित केली आहे.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रशांत यादव, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद अधटराव, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, जिल्हा संयोजक विनोद भोबस्कर उपस्थितीत राहणार आहेत. भाजपाच्या संगमेश्वर उत्तर दक्षिण मंडळातील कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी कार्यकत्यांनी उपस्थित रहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 12/Sep/2025