Virat Kohli Ends Contract With RCB : आयपीएलमध्ये विराट कोहली या नावासाोसबत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू या संघाचे नाव हमखास जोडले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून तो या संघाकडून खेळतो आहे.
विशेष म्हणजे गेल्या हंगामात बंगळुरू संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. या संघाचा कोहली भाग होता. दरम्यान, आता आगामी आयपीएल हंगामाचे वेध लागले आहेत. असे असतानाच स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत मोठी आणि आश्चर्यात टाकणारी माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे आता कोहलीच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू संघातर्फे खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कराराचे नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळेच आता विराट कोहलीच्या मनात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विराट कोहली संन्यास घेण्याच्या विचारात नाही ना? असाही सवाल उपस्थित केला जातोय.
आगामी वर्षात आयपीएल 2026 हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी फ्रँचायझी तयारी करत आहेत. या फ्रेन्चायझीकडून खेळाडूंचे करार रिन्यू केले जात आहेत. विराट कोहली गेल्या अनेक हंगामांत आरसीबी संघाकडून खेळलेला आहे. यावेळीही त्याला कराराचे नुतनीकरण करण्यासाठी विचारण्यात आले होते. मात्र त्याने या नुतनीकरणासाठी नकार दिल्याच्या दावा केला जात आहे. सोबतच भविष्यात माझा चेहरा किंवा माझे नाव न वापरता तुम्ही भविष्यातील नियोजन आखावे, असेही कोहलीने रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू या फ्रेन्चायझीला सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच कोहलीच्या या कथित भूमिकेने क्रिकेट रसिकांना चांगलाच धक्का बसला आहे. आरसीबी किंवा कोहली यांच्याकडून मात्र यावर अद्याप कोणेतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
बंगळुरू संघ नेमकं काय करणार?
विराट कोहलीचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधीच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला की क्षणात लाखो लोक लाईक करतात. विराट कोहली संघात असल्यामुळे आर्थकारणाच्या दृष्टीने रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू संघाला मोठा फायदा होत आलेला आहे. आता मात्र विराट कोहलीने कराराचे नुतनीकरण करण्यास नकार दिलेला असेल तर बंगळुरू संघ नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 13-10-2025














