Sangameshwar : साखरपा, देवरूख परिसरात अचानक कोसळलेल्या पावसाने नुकसान

साखरपा : गेले दोन दिवस शेतात कापून सुकण्यासाठी ठेवलेल्या पिकांवर अचानक कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी जोरात कापणीला लागले होते. पावसाचा किंवा मळभाचा मागमूस नसल्यामुळे तसेच संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या कडक उन्हामुळे ठिकठिकाणी शेतात कापून ठेवलेले भातपीक शेतकरी तसेच ठेवत होते. दोन तीन दिवसांनी पीक पूर्ण सुकल्यावर शेतकरी ते बांधून घरी आणत होते. आज बुधवारी दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि साखरपा, देवरूख परिसरात ठिकठिकाणी मळभी वातावरण तयार झाले.

अचानक पावसालाही सुरुवात झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. वेळेअभावी कापलेले पीक शेतातून बांधून घरी आणणे शक्य झाले नाही. परिणामी, ठिकठिकाणी शेतात कापून ठेवलेले पीक पावसात भिजले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 16/Oct/2025