रत्नागिरी : कोकणनगर येथील तरुणाला फिट आल्याने तो स्वयंपाकघरात कट्ट्यावर आपटला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जावेद शौकत बंदगी (वय ३४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १८ ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास कोकणनगर येथे घडली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 03/Nov/2025













