चिपळूण : पावसामुळे तालुक्यात सुमारे ६३०.९ हेक्टरवर २ हजार ६५० इतके शेतकरी बाधित असून, नुकसानग्रस्त भातशेतीचे अद्यापही पंचमाने सुरूच आहेत. प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळताना शेतकऱ्याचा फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार असून, तो नसल्यास शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत. तालुक्यात ३५ हजार २७५ इतक्या शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढलेला नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
‘फार्मर आयडी’ हे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र असून, जे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. पीएम-किसान सन्मान निधीसारख्या योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले असून, याशिवाय शेतीविषयक योजना, अनुदान, विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभमिळवणे सोपे होते. तालुक्यात सध्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे.
तालुक्यातील १६८ गावांत हे नुकसान झाले असून, त्यानुसार या नुकसानग्रस्त शेतीचे कृषी, महसूल तर ग्रामसेवकांकडून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत. तालुक्यात ७ हजार हेक्टरवर भातशेती असून, आतापर्यंत ६३०.९ हेक्टरवरचे पंचनामे झाले आहेत. त्यामध्ये २,६५० इतके शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनामे पूर्णत्वास गेल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळतेवेळी या शेतकऱ्याचा फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 12/Nov/2025













