विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात संशोधन करावे : डॉ. संजय भावे

रत्नागिरी : शेतीचा अभ्यास हा मूलभूत विज्ञानाचा भाग आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीन केलेले संशोधन प्रत्येक संशोधकाने केले पाहिजे. तंत्रज्ञानाची सांगड आपल्या संशोधनात घालता आली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात संशोधन करू द्यावे. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत, नवीन कल्पकता सातत्याने दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजय भावे यांनी केले.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. विवा एक्झिक्यूटीव्ह येथे झालेल्या कार्यक्रमात कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. मधुरा मुकादम उपस्थित होते.

या परिषदेमध्ये देश विदेशातील महाविद्यालये व संशोधन संस्था तसेच उद्योजक सहभागी झाले होते. प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले. ६६ शोधानिबंधांचे सादरीकरण झाले. यात मूलभूत विज्ञान विभागातून शुभम जितुरी (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा), रेश्मा देवरुखकर (गोगटे जोगळेकर कॉलेज), सर्वेश कुंदरगी (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण). जैविक विज्ञान विभाग मिथिला चिंचळकर (मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड), दिपाली सुरवशे (देवचंद कॉलेज, अर्जुन नगर), फरहीन खान (गोगटे कॉलेज), ऑनलाइन विभागात सुनिलकुमार गुप्ता (मिठीबाई कॉलेज), प्रशांत जाधव (एएसपी कॉलेज, लांजा) हे उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून गौरविले गेले.

भित्तीपत्रिका स्पर्धेचा निकाल

परिषदेदरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी महाविद्यालयामार्फत संशोधन भित्तिपत्रिका सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत ३६ भित्तिपत्रिकांचे सादरीकरण झाले. मूलभूत विज्ञान प्राध्यापक गट नम्रता गांधी (दापोली अर्बन बँक सीनियर कॉलेज), पद्मनाभ सरपोतदार (गोगटे जोगळेकर कॉलेज). विद्यार्थी गट- कौस्तुभ सरदेसाई, सार्थक जोशी, साक्षी पाध्ये, स्वरदा केळकर (गोगटे जोगळेकर कॉलेज), अथर्व बेंबळगे श्रीकांत जाधव, फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे). जैविक विज्ञान विभागात प्राध्यापक गट- प्राची भाटिया (गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई), रूपाली साळुंखे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे). विद्यार्थी गट- जैविक विज्ञान विभागात ऋतुराज पिलणकर (गोगटे जोगळेकर कॉलेज), निकिता राशिनकर (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 24/Nov/2025