रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते व रक्तदान शिबिराचे विक्रमवीर जकी खान यांचे वतीने 22 सप्टेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जकी खान मित्र परिवार चे रशीद काझी,मंझूर शेख, युसुफ सोलकर,आयान शेख, प्रदीप देवरुखकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराला शहरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला 168 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेतला.यामध्ये महिलांनी खूप प्रतिसाद दिला.कोल्हापूर येथील सी पी आर हॉस्पिटल व रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल यांचे सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्ण पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे जात असतात त्यांना तेथे रक्ताची गरज भासते त्यामुळे त्यांचा सहभाग या शिबिरात करण्यात आला होता.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी राशीद काझी,सर्जील भट्टीवाले, फरहान काद्री,नफीस डोंगरकर,मुजाहिद जमादार,मोईन मापारी,मंझुर शेख,समीर काद्री,जुनेद खान, युसुफ सोलकर, प्रदीप देवरुखकर,अबूमिया मुक्री,अर्श नेवरेकर,दानिश जमादार,निहाल काद्री, सलमान काझी,अय्यान शेख,समद वस्ता,सुफीयान शेख,सुबहान शेख यांनी सहकार्य केले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे जकी खान यांनी आभार मानले .