देवरूख : शहरातील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ (गटशेती) च्या शेतकरी प्रशिक्षणाचे १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, संगमेश्वर व पंचायत समिती देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना या गटात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे, याबाबतची माहिती या एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणात दिली जाणार आहे. गटाची कार्यपद्धती, तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण, शेतकरी गट तयार करणे याबाबत सदर कार्यशाळेमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी कळवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 29/Nov/2025














