राजापूर : कोकणात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे कोकणातील रस्ते आणि महामार्गाची झालेली दुरवस्था याकडे आमदार नीलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्दद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. राज्याच्या अन्य भागात पडणारा पाऊस आणि कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता कोकणाला मराठवाडा विदर्भाचे निकष न लावता कोकणाला स्वतंत्र निकष लावावेत, अशी जोरदार मागणी केली.
आ. नीलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशात अतिवृष्टीमुळे कोकणातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले, ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग यावर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जातो. कोकणात पडणारा प्रचंड पाऊस पाहता येथे डाकडुजी दरम्यान केलेला सर्व खर्च हा वाया जातो. या वर्षी कोकणामध्ये जवळपास सहा महिने कोकणामध्ये भरपूर पाऊस होता. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता. सहा महिने कोकणामध्ये पाऊस पडला तुम्ही विचार करा त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल. आम्ही कॉन्ट्रॅक्टर्सना जेव्हा विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही, आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही. सहा महिने पाऊस पडल्यामुळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर ढगांकडे बोट दाखवतोय. कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर ते लोक आहेत. मागची बिल काढली गेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातून म्हणून अजूनपर्यंत नवीन कॉन्ट्रॅक्ट घ्यावा की न घ्यावा कॉन्ट्रॅक्टरांना पडलेला हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना आ. राणे म्हणाले की, माझ्या मतदारसंघामध्ये चार हजार मिलिमीटर हा पाऊस पडतो आम्ही तर रस्ते कसे टिकवायचे. मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट इकडे येतात. मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते. डंपर वाहतूक होते अशा परिस्थितीत जर आपण रस्त्याची क्वालिटी जर मेंटेन केली नाही तर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी त्यांनी याला जवाबदार अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अशा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा जागच्या जागी त्याचा बंदोबस्त व्हावा आणि शासनाने ते लवकरात लवकर करावे आणि कोकणातील रस्ते नीट करावेत. कोकणचे जे निकष आहेत ते बदलून टाका. विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका, अशी आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.
जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणचे निकष कोकणच्या रस्त्यांना आपण लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाहीत. दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्त्याचा टिकवता आलं नाही तर ती चूक आपली असं मला वाटते. नीलेश राणे, शिवसेना आमदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 10/Dec/2025














