राजापूर : लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने उभारलेल्या प्रशस्त आणि सुसज्ज मच्छी मार्केटमध्ये मासेविक्री करण्याऐवजी अनेक महिला शिवाजीपथ रस्त्याच्या कडेला बसून मासेविक्री करत आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पालिकेची कारवाई झुगारत शिवाजीपथ रस्त्यावर पुन्हा मासेविक्रीसाठी विक्रेते बसले आहेत.
शहरातील मुन्शीनाका परिसरामध्ये पालिकेने सुसज्ज आणि प्रशस्त असे मच्छी मार्केट उभारले आहे. या ठिकाणी मासेविक्री करण्यासाठी ओटे आणि अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा आहेत. त्यामध्ये मच्छीमार्केटमध्ये बसून मासेविक्री करणाऱ्यांकडून पालिकेकडून कर आकारला जातो. तरीही अनेक महिला मच्छी मार्केटमध्ये बसून मासेविक्री करण्याऐवजी अर्जुना कोदवली नद्यांच्या काठावरील शिवाजीपथ रस्त्यावर बसून विक्री करतात. येथे मासेविक्री करू नये, अशी वारंवार सूचना पालिकेने केली आहे. त्यानंतर मासेविक्री करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. महिलांकडील मासे जप्त करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पालिकेत झालेल्या बैठकीत मासेविक्रेत्या महिलांनी मच्छी मार्केटमध्ये विक्री करण्याचे मान्य केले आणि मार्केटमध्ये मासेविक्री करण्यास
सुरुवात केली. मात्र, काही दिवस मासेविक्री केल्यानंतर पुन्हा या महिला पूर्ववतपणे छत्रपती शिवाजीपथ रस्त्यावर मासेविक्री करत आहेत. रस्त्याच्या र कडेला मासेविक्री करणाऱ्यांच्या कविरोधातील पालिकेने दुर्लक्ष केले आहे.
वाहतूक कोंडीची समस्या
छत्रपती शिवाजीपथ रस्त्यावर या ने मासेविक्रीच्या ठिकाणी अनेकवेळा के खवय्यांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामध्ये अनेकांकडून त्या – ठिकाणी खासगी दुचाकी, चारचाकी गाड्या उभ्या करून मासे खरेदी केली जाते. त्यातून, या ठिकाणी वाहनांचीही गर्दी होते.
ज्या भागामध्ये या महिला मासेविक्रीसाठी बसतात त्या भागामध्ये रिक्षा स्टॅण्डसह मोठ्या चारचाकी गाड्या आणि टेम्पोही रस्त्यानजीक पार्किंग करून ठेवलेले असतात. त्याचवेळी कोल्हापूर वा अन्य भागांतून घाऊक माल घेऊन आलेले ट्रकही या भागामध्ये उभे असतात. वाहनांच्या भाऊगर्दीमुळे रस्ता अरुंद ठरतो. त्यामुळे वाहतूककोंडी होते
नागरिकांकडूनही तक्रारी
छत्रपती शिवाजीपथ रस्त्यावर ज्या ठिकाणी मासेविक्री करणाऱ्या महिला त्या ठिकाणी वा त्या लगतच्या परिसरामध्ये माशाची घाण टाकतात. त्याचवेळी दुर्गंधीयुक्त पाणीही त्या ठिकाणी टाकतात. या ठिकाणी टाकण्यात येणारी घाण आणि पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत सातत्याने पालिका प्रशासनाकडे नागरिकांकडून तक्रारीही केल्या गेल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 10/Dec/2025













