Sangameshwar : फुणगूस परिसरात बीएसएनएलचा टॉवर असूनही नेटवर्कची बोंबाबोंब

संगमेश्वर : तालुक्यातील फुणगूस परिसरातील मोबाइल नेटवर्कची समस्या दूर होण्यासाठी बीएसएनएलकडून टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, हा टॉवर सुरु न केल्याने नेटवर्कची समस्या कायम आहे. त्यामुळे टॉवर शोभेचे बाहुले बनले असून, मोबाइल बंदच आहेत.

बीएसएनएलने टॉवरची उभारणी केल्यानंतर या परिसरातील ग्रामस्थांनी हौशीने मोबाइल आणि सीमकार्ड घेतले. मात्र, टॉवरच सुरू न झाल्याने मोबाइल आणि सीमकार्ड धूळखात पडलेले आहेत. त्यातच परिसरातील डिजिटल सेवाही कोलमडलेलीच आहे. बीएसएनएलच्या या सेवेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 11/Dec/2025