विद्यार्थ्यांनी कुतूहलशक्ती जागरूक ठेवावी : डॉ. श्रीपाद बाणावली

चिपळूण : बघण्यात व निरीक्षण करण्यात फार फरक आहे. निरीक्षण करताना विचार करणे महत्त्वाचे आहे. जो संशोधक आहे तो केवळ बघत नासून निरीक्षण करतो. त्यामुळे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन जागा होतो. यासाठी नेहमी कुतूहल शक्ती जागरुक ठेवा, असे आवाहन टाटा रुग्णालय संशोधक डॉ. श्रीपाद बाणावली यांनी केले.

डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चौरटीज ट्रस्टच्या प्रशालेत जिल्हा परिषद, पंचायत समिती व जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शन उद्घाटनावेळ ते बोलत होते. डॉ. बाणावली पुढे म्हणाले की, आपण शिक्षकांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आपण मोबाईलमध्ये न गढून जाता आपली विचारप्रणाली प्रगल्भ करणे आवश्यक आहे. सतत वाचत राहा. मोबाईलमुळे आपली मेमरी लॉस होत आहे. सद्यस्थितीत विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या सोयीसुविधा प्राप्त होत आहेत.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, गटशिक्षण अधिकारी दादासाहेब इरनाक, डॉ. नेताजी पाटील, संचालिका शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, मुख्याध्यापक प्रज्ञा पारकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 13/Dec/2025