पतितपावन मंदिर रंगमंचासाठी सुहासि रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे भरघोस देणगी

रत्नागिरी : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि रविंद्र चव्हाण यांनी ही मदत दिली. या निधीचे वितरण नुकतेच करण्यात आले.
पतितपावन मंदिराच्या आवारात असलेल्या रंगमंच नूतनीकरण, शेड उभारणी सुशोभीकरण आदींच्या कामासाठी ही मदत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने यांनी पतितपावन मंडळाचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेश मंडळाचे अध्यक्ष मंदार खेडेकर व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निधी सुपुर्द केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, मंत्री रविंद्र चव्हाण हे राज्याचे मंत्री असून पालघर व सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. त्यांना रत्नागिरीतून मतदान होत नाही. परंतु रविंद्र चव्हाण हे या मतदारसंघाशी मनाने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. सोमेश्वर येथे गोशाळेकरिताही भरघोस मदत देऊ केली आहे. भागोजीशेठ कीर यांनी उभारलेल्या या मंदिराला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वा. सावरकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. सुशोभिकरणासाठी अनिकेत पटवर्धन, शिल्पा मराठे यांनी पाठपुरावा केला. पंतप्रधानांचा वाढदिवस हे सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे. या सर्व कार्यात आपणही सहभागी होऊया.
या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, संकेत कदम, सुशांत पाटकर, धनंजय मराठे, विक्रम जैन, मोहन दामले, भाई दळी, राकेश नलावडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.