खेड : अस्तान मार्गावरील दरड हटवली

Jun 13, 2024 - 10:02
Jun 13, 2024 - 10:12
 0
खेड : अस्तान मार्गावरील दरड हटवली

◼️ माती ढासळत असल्याने धोका कायम; सतर्क राहण्याचे आवाहन

खेड : तालुक्यातील अस्तान ते धनगरवाडी या रस्त्यावर मंगळवारी दि. ११ रोजी डोंगरावरील दरडींची माती कोसळल्याने रस्त्यावर अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सार्वजनिक बांधकाम विभागाने दूर करून रस्ता रहदारी योग्य बनवला आहे. 

परंतु येथे रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरील माती ढासळत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

तालुक्यातील अठरागाव पंचक्रोशी सह्याद्रीच्या रांगेत वसलेला भाग आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागात सातत्याने डोंगर ढासळण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दि. ११ रोजी अस्तान ते धनगरवाडी रस्त्यावर दगड माती कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबीद्वारे रस्त्यावरील माती व चिखल बाजूला करण्यात आला आहे. मात्र, पाऊस पडत असून रस्त्याशेजारील डोंगरावरील माती ढासळत असल्याने पुन्हा माती व दगड रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रांताधिकारी शिवाजी जगताप ग्रामस्तरावर भेट देऊन उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल यांना सूचना देऊन सतर्क राहण्यास सांगितले आहे.

अस्तान धनगरवाडीमध्ये १२ कुटुंबे असून बहुतांशी लोक चालत अस्तान गावामध्ये येत असतात. त्यामुळे धनगरवाडी मार्गावर डोंगरावरील माती कोसळली तरी वस्तीचा संपर्क तुटलेला नव्हता. - शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow