T20 World Cup 2024, IND vs USA : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी

Jun 13, 2024 - 11:45
 0
T20 World Cup 2024, IND vs USA : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून Super 8 मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला.

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. सूर्यकुमारचा झेल सोडणे अमेरिकेला महागात पडले. सूर्यकुमार व शिवम यांनी केलेली ६७ धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

विराट कोहली ( ० ) व रोहित शर्मा ( ३) यांना सौरभ नेत्रावळकरने माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांनी काहीकाळ खिंड लढवली, परंतु अली खानने अप्रतिम चेंडूवर रिषभचा ( १८) त्रिफळा उडवला. गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा वापर अमेरिका चांगल्यारितीने करून घेत होती आणि त्यामुळे शिबम दुबे दडपणाखाली खेळताना दिसला. तो दोनवेळा रन आऊट होता होता वाचला. सूर्यकुमारनही अमेरिकन गोलंदाजांचा मारा पाहून हडबडला. सूर्याचा २२ धावांवर असताना सौरभकडून झेल सुटला आणि भारतीय फलंदाजाच्या पत्नीने देवाचे आभार मानले. ही कॅच सोडून अमेरिकेनं खरं तर मॅच गमावली. सूर्याने त्यानंतर फटकेबाजी सुरू केली. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow