T20 World Cup 2024 : सुपर-8 चा आज पहिला सामना दक्षिण अफ्रिका अन् अमेरिका यांच्यात

Jun 19, 2024 - 15:47
 0
T20 World Cup 2024 : सुपर-8 चा आज पहिला सामना दक्षिण अफ्रिका अन् अमेरिका यांच्यात

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज सुपर-8 चा पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका (United States vs South Africa) यांच्यात होणार आहे.

हा ग्रुप-2 चा सामना असेल. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक मजबूत दिसत आहे, कारण संघाने गट टप्प्यातील चारही सामने जिंकले आहेत. आज, दोन्ही संघ सुपर-8 लढतीसाठी त्यांच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतील.

दोन्ही संघांनी अमेरिकेत ग्रुप स्टेजचे सामने खेळले. आता सुपर-8 चे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळेल. गतविजेता इंग्लंड आणि यजमान वेस्ट इंडिजचा संघ याच गटात असल्याने दक्षिण अफ्रिकेचा संघ अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही.

आता सुपर 8 चे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. त्यामुळे अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात फिरकीपटूंचं वचर्स्व पाहायला मिळेल. गतविजेता इंग्लंड आणि यजमान वेस्ट इंडिजचा संघ याच गटात असल्याने दक्षिण अफ्रिकेचा संघ अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात काय बदल होऊ शकतात?

केशव महाराजच्या रूपाने आफ्रिकन संघात अतिरिक्त फिरकीपटू पाहायला मिळेल. नेपाळविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या गट सामन्यात केशव महाराज प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. आता त्याला सुपर-8 साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळू शकते.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन, तबरेझ शम्सी.

कर्णधार मोनांक पटेल पुनरागमन करणार?

अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल भारताविरुद्धच्या सामन्यात किरकोळ दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मोनांकच्या जागी आरोन जोन्सने संघाची कमान सांभाळली. आता कर्णधार मोनांक सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात पुनरागमन करू शकतो.

अमेरिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

मोनांक पटेल (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow