रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवड्याला सुरुवात...

Jun 13, 2024 - 15:09
 0
रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून  अतिसार नियंत्रण पंधरवड्याला सुरुवात...

रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे. एकूण ४७ हजार ६६८ बालकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत तपासणी इवलेल्या बालकांमध्ये १७० बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस (क्षारसंजीवनी) देऊन ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात दि. ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पुर तसेघ नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे.

या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी कितीविरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगहाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कोकणनगर, रत्नागिरी येथे उपचाराकरिता आलेल्या बालकांना ओआरएसचे पाकीट देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कोकणनगरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, पी. एच. एन. श्वेता तारये, आरोग्य पर्यवेक्षक के. एन. बिराजदार, आरोग्य सहाय्यक शेट्ये, लसीकरण सनियंत्रक तुषार साळवी उपस्थित होते.

या मोहिमेत आशा व आरोग्य कर्मचारी यांनी पाणी शुद्धीकरण, वैयक्तिक स्वच्छता तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व हात धुण्याच्या योग्य पद्धतीच प्रात्यक्षिक करून आस्तीत जास्त जनतेपर्यंत जनजागृती करून अतिसार नियंत्रित कसा करता येईल याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पुजार यांनी दिल्गा, प्रत्येक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यिका यांच्यामार्फत आशा व आरोग्य कर्मचारी यांना विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड़ा मोहिमेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्ह्य आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिल्या.

अतिसाराची लक्षणे आढळली, तर दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी किवा पुढील संदर्भ सेवेसाठी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधवा डॉ. अनिरुद्ध आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी

मोहिमेचा उद्देश
नवजात अर्भक व ५ वर्षा आतील एकूण्ण बालमृत्यूपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू दर कमी करणे हा मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.

अतिसाराची लक्षणे
जर बाळ अस्वस्थ, चिडचिडे झाले बालकाला (दोन महिन्यांपेक्षा मोठ्या) खूप तहान लागत असेल, किंवा ते पाणी पिऊ शकत नसेल, त्याला भोवळ आली किवा बेशुद्ध झाले जर डोळे खोल गेले, पोटावर हलका चिमटा काढल्यावर त्वचा अगदी मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow