चिपळूण : कामथेत ३ हजार ५०० रोपांची लागवड

Jul 3, 2024 - 12:03
Jul 3, 2024 - 12:34
 0
चिपळूण : कामथेत  ३ हजार ५०० रोपांची लागवड

चिपळूण : हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १११ व्या जयंती तसेच वनमहोत्सवानिमित्त चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना यांच्यातर्फे कामथे ग्रामदेवता सुकाईदेवी मंदिराच्या १० एकर देवरहाटीमध्ये ३ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष अमित सावंत, सतीश मोरे, संजय थरवळ, बाळा ओतारी, अनंत पवार, प्रीतम कदम, सुजित मोरे, रूपेश खांडेकर, प्रथमेश बोभस्कर, कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सामाजिक वनीकरण, वन विभागाचे कर्मचारीही या उपक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी व्यासपीठावर विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वन अधिकारी परदेशी, पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, कामथे बुद्रुकच्या सरपंच हर्षदा कासार, कामथे खुर्दच्या सरपंच सरस्वती हरेकर, रोटरी क्लब अध्यक्ष अविनाश पालशेतकर, जमालुद्दीन बंदरकर, तलाठी कोकाटे, ग्रामसेवक कादवडकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष संभाजी खेडेकर उपस्थित होते. पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, विलास महाडिक, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी उपस्थितांना संबोधित केले. आभार सतीश मोरे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow