वाशिष्ठी नदीपात्रात आढळलेला 'तो' मृतदेह आंबडसमधील वृद्धाचा

Jun 14, 2024 - 10:41
 0
वाशिष्ठी नदीपात्रात आढळलेला 'तो' मृतदेह आंबडसमधील वृद्धाचा

चिपळूण : खांदाटपाली येथे वाशिष्ठी नदीपात्रात एकाचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेश पांडुरंग मोरे (६०, रा. आंबडस सोलकरवाडी, ता. खेड) असे त्यांचे नाव आहे. 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मोरे हे दि. ९ जून रोजी घरात झोपलेले होते. मात्र, सकाळी त्यांची आई सुरेखा मोरे झोपेतून उठल्यानंतर सुरेश मोरे हे त्या ठिकाणी न आढळल्याने शोधाशोध सुरू केली. दि. ११ जून रोजी सकाळी १० वा. खेड पोलिस ठाण्यात या प्रकरणी बेपत्ता म्हणून दाखल करण्यात आले. त्यानंतर चिपळूण खांदाटपाली येथे वाशिष्ठी नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. खात्री केली असता तो मृतदेह सुरेश मोरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मोरे यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow