राजापुरातील १२ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Jun 14, 2024 - 11:05
Jun 14, 2024 - 11:06
 0
राजापुरातील  १२ वाड्यांना  टँकरद्वारे पाणीपुरवठा

राजापूर : तालुक्यामध्ये मॉन्सून सक्रिय झाल्याने भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतही प्रवाहित झाले असून, धरणांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई संपुष्टात आली असली तरी अद्यापही ग्रामीण भागामध्ये टँकर धावत आहेत. तालुक्यातील दहा गावांमधील बारा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. तब्बल तीन वर्षांनंतर राजापूरमध्ये टँकर धावला. यामध्ये ओणी पाचलफाटा, ओझर-धनगरवाडी, वडवली-बौद्धवाडी, शिवाजीनगर, वडदहसोळ-हळदीची खांदवाडी, दोनिवडे-धनगरवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ -बौद्धवाडी, तळगाव-तांबटवाडी, नवानगर देवाचेगोठणे-पाटवाडी, प्रिंदावण-तळेखाजण, हसोळतर्फ सौंदळ अशा दहा गावांमधील बारा वाड्यांमध्ये तीन टँकरद्वारे गेले महिनाभर पाणीपुरवठा सुरू आहे.

मॉन्सून सक्रिय झाल्याने शहरातील पाणीटंचाई संपुष्टात आली; मात्र ग्रामीण भागातील बारा वाड्यांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासूनही पाणीपुरवठ्यासाठी टँकर धावला नव्हता; मात्र जून महिन्यामध्ये नाटे येथील गणेशनगर, नजफनगर भाग, जुवाठी गावातील काही भाग, हसोळतर्फ सौंदळ, सोल्ये या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. पाणीटंचाईची भीषणता वाढत असताना लोकांच्या मदतीला पाऊस आला होता. त्यामुळे गतवर्षी टँकर धावला नव्हता. यावर्षी जून महिन्यात टँकर धावत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow