लांज्यातील ४० कोटींच्या फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर व्हावा ; आ. शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी

Jul 5, 2024 - 13:53
Jul 5, 2024 - 14:55
 0
लांज्यातील ४० कोटींच्या फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर व्हावा ; आ. शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी

लांजा : लांज्यातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली आहे. आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात ४० कोटींचा फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी मागणी केली आहे.

लांजा येथे ४० कोर्टीचा फणस संशोधन केंद्र प्रस्ताव कोकण कृषी विद्यापिठाने राज्य शासनाला यापूर्वीच सादर केला आहे; मात्र, हा प्रस्ताव अद्याप निधीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. रखडलेल्या या प्रस्तावाबाबत लांजातील सिराज नेवरेकर यांनी आमदार शेखर निकम आणि आमदार राजन साळवी यांच्याशी संपर्क साधून रखडलेल्या फणस संशोधन केंद्रासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. बुधवारी (ता. ३) अधिवेशनामध्ये महायुती सरकारने सर्वसमावेशक मांडलेल्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना कोकणातील काही ठळक मुद्दे आमदार शेखर निकम यांनी मांडले. त्यामध्ये देवरूख येथील सायन्स अॅड इनोव्हेशन सेंटर येथे एनईपीसी सेंटर व विज्ञानविषयक लायब्ररी सुरू करण्यास पाठिंबा द्यावा, शासन मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, ही अभिनंदनीय बाब असून वर्ष दोन वर्षापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनादेखील त्याचा लाभ मिळावा, महात्मा गांधी जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवलेल्या क्रांतिकारी निर्णयाबद्दल सरकारचे त्यांनी अभिनंदन केले.

शेखर निकमांनी केलेल्या ठळक मागण्या..
• कोकणात बांबू लागवडीसाठी प्राधान्य द्यावे
• खैर वृक्ष लागवडीसाठी विशेष योजना राबवावी
• लांजा येथील फणस संशोधन केंद्र मंजूर व्हावे.
• कोकणातील नमन, जाखडी व खेळे या कलाकारांना मानधन व पेन्शन मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा.
• चिपळूण, खेड व राजापूर येथील नद्यांना पावसाळी येणाऱ्या पूर नियंत्रणासाठी निधी उभारावा.
• संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व गडगडी नदी लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाईपलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे
• कोकणातील डोंगराळ भागातील धनगर समाजाचे पुनर्वसन व्हावे
• राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ व्हावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow