खेड बसस्थानकातून वृद्धाची बॅग पळवत ९४ हजारांची रोकड चोरली

Jun 14, 2024 - 14:52
Jun 14, 2024 - 14:53
 0
खेड बसस्थानकातून वृद्धाची बॅग पळवत ९४ हजारांची रोकड चोरली

खेड : येथील बसस्थानकात झोपलेल्या वृद्धाची बॅग लांबवून त्यातील ९४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्याने लांबवली. ही घटना ११ जूनला घडली.

या प्रकरणी मोहम्मद अ. ऐसान खान (वय ७७) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ११ जूनला रात्री ११.४५ वा. खेड बसस्थानकात खान विश्रांती घेत होते. त्यांनी डोक्याखाली बॅग घेतली होती. त्या वेळी खान झोपल्याचा फायदा घेत बॅग चोरून नेली. त्यामध्ये ९४ हजार ५०० रुपये आणि कपडे होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow