पदवीधर निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Jun 14, 2024 - 15:47
 0
पदवीधर निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे : लोकसभा निवडणुकीत कोकणच्या मतदारांनी पसंती देऊन भाजपा महायुतीला यश मिळाले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारवर मतदारांनी विश्वास दाखविल्याची ही पावती आहे, याचपद्धतीने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रेकॉर्ड मतांनी विजयी होणार असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पालघर व ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. पालघर जिल्ह्यातील विक्रमगढ, मनोर, नालासोपारा आणि ठाण्यातील मिरा रोड (पूर्व) या भागात भाजपासह महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करीत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे, असे सांगून त्यांनी मागील अडीच वर्षातील महायुती सरकारची कामगिरी, लोकहिताचे निर्णय व सरकारने पदवीधरांसाठी आखलेल्या विविध योजना माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले. आ. निरंजन डावखरे यांनी सभागृहात पदवीधरांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना मिळावी यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री बावनकुळे यांच्या या प्रचार दौऱ्यात पालघरचे खा. हेमंत सावरा, आ. संजय केळकर, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, राजेंद्र गावित यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow