ब्रेकिंग : Maharashtra SSC 10th Class Result : 27 मे रोजी दहावीचा निकाल

May 25, 2024 - 13:33
 0
ब्रेकिंग : Maharashtra SSC 10th Class Result : 27 मे रोजी दहावीचा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) येत्या 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती. दरम्यान, खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.

16 लाख विद्यार्थांनी परीक्षेसाठी केली नोंदणी

मंडळाने काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण मंडळातील निकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागले होते. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धाकधूक वाडली आहे. मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे.

नऊ मंडळांमध्ये घेण्यात आली दहावीचा परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व नऊ विभागांचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे.

इतर माहितीसाठी कोणते संकेतस्थळ

दुपारी एक वाजता खालील संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्याला विषयनिहाय मिळालेले गुन देण्यात येतील. या गुणांची विद्यार्थ्यांना प्रिंट आउटही घेता येईल. विशेष म्हणजे https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल

1. https://mahresult.nic.in

2. https://sscresult.mkcl.org

3. https://sscresult.mahahsscboard.in

4. https://results.digilocker.gov.in

5. https://results.targetpublications.org

दरम्यान, जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 31/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow