छायाचित्रकारांनी बदलत्या काळानुसार बदलावे चिपळुणात व्हिडीओग्राफर-फोटोग्राफर्सच्या कार्यशाळेतील सूर

May 27, 2024 - 12:30
 0
छायाचित्रकारांनी बदलत्या काळानुसार बदलावे चिपळुणात व्हिडीओग्राफर-फोटोग्राफर्सच्या कार्यशाळेतील सूर

 चिपळूण : डिजिटलच्या बदलत्या आधुनिक काळात छायाचित्रकार व्यावसायिकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून नव्या तंत्रज्ञानासोबत जायला हवे अशा स्वरूपाचे मत चिपळूण येथे झलेल्या व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर जिल्हा असोसिएशनच्या कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

चिपळुणातील हॉटेल ओअॅसिस कॅनॉन इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील फोटोग्राफर- व्हिडीओग्राफर असोसिएशनमधील सर्व सदस्य सभासदांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण तालुका असोसिएशनच्या माध्यमातून ही कार्यशाळा झाली. यावेळी जिल्हाभरातील खेड, गुहागर, मंडणगड, दापोली, चिपळूण येथील फोटोग्राफर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद मोहिते यांनी, बदलत्या काळाबरोबरच व्यावसायिकांनी देखील स्वतः मध्ये बदल घडवावेत, असे आवाहन केले. तांत्रिक विषयावर तुषार जोशी यांनी मार्गदर्शन करताना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फोटोग्राफर्सनी करावा, असे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संघटनेतील काही फोटोग्राफर्सचा सन्मान करण्यात आला. शिबिराचे आयोजन करण्यासाठी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सचिव प्रविण पाकळे, खजिनदार गिते, संदेश पेवेकर यांच्यासह तालुकाध्यक्ष सचिन शेठ, बाळा सासणे, राजेश खांबल यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)


शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow