रत्नागिरी जिल्ह्यात परसबागेतील कुक्कुटपालन राजापुरात सर्वाधिक

Jun 15, 2024 - 17:11
Jun 15, 2024 - 17:18
 0
रत्नागिरी जिल्ह्यात परसबागेतील कुक्कुटपालन राजापुरात सर्वाधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कुक्कुटपालन गेल्या १५ वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या कालावधीत व्यावसायिक आणि परसबाग फार्ममधील १ लाख ९४ हजार ०६ इतक्या कोंबड्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात पशुगणनेनुसार सध्यस्थितीत जिल्ह्यात ८ लाख ५८ हजार ७४६ कोंबड्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात परसबागेतील कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये राजापूर तालुक्यात सर्वाधिक कोंबड्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परसबागेतील कोंबड्या पालनाचे प्रमाण मोठे आहे. तब्बल ८ लाख ६ हजार ३३३ परसबागेत कोंबड्या असून व्यावसायिक फार्ममध्ये ५२ हजार ४१३ कोंबड्या आहेत. सन २०१९ मधल्या २० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील कोंबड्यांची ही आकडेवारी आहे. या पशुगणनेनुसार राजापुरात सर्वाधिक म्हणजे १ लाख २० हजार ७९ कोंबड्या असल्याची नोंद आहेत.

सन २००३ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार व्यावसायिक आणि परसबागेतील १० लाख ५२ हजार ७५२ कोंबड्या होत्या. त्यानंतर झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार ही संख्या १ लाख ९४ हजार ०६ ने कमी होवून ८ लाख ५८ हजार ७५२ इतकी कमी झाली आहे.

कुक्कुटपालन उद्योग बारमाही उत्पन्न देणारा असून परसबागेतील गावठी कोंबड्यांना मोठी मागणी असते. काही विशेष सणांच्या दिवशी या कोंबड्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. कोंबड्यांचे मांस आणि अंडी चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत.

पशुगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सर्वाधिक १ लाख २० हजार ७९ कोंबड्या आहेत. पाठोपाठ संगमेश्वरात १ लाख १० हजार ३७०, दापोलीत १ लाख १० हजार ११५ तर गुहागरात १ लाख ८४ हजार ६७ कोंबड्या आहेत.

मंडणगड तालुक्यात केवळ ४३ हजार २८०, खेडमध्ये ६४ हजार ९८, चिपळूणध्ये ९४ हजार २६९, रत्नागिरी तालुक्यात ९८ हजार १३६ कोंबड्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:39 PM 15/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow