दापोली : ओळगावातील शेतकऱ्यांनी घेतला जागा न विकण्याचा निर्णय

May 27, 2024 - 13:05
May 27, 2024 - 16:12
 0
दापोली : ओळगावातील शेतकऱ्यांनी  घेतला जागा न विकण्याचा निर्णय

दापोली : दापोलीतील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित जागा या गरजेसाठी विकल्या, पण तेच शेतकरी आता विकलेल्या जागेत मजूर म्हणून काम करताना दिसत आहेत. याबाबत आता दापोली तालुक्यातील ओळगाव गावाने धाडसी पाऊल उचलले असून गावातील जागा या इतरांना खरेदी करण्यास मनाई आहे, असे फलक गावात लावले आहे. त्यामुळे उशिरा का होईना, दापोली तालुक्यातील शेतकरी जागा होतोय, असे या ओळगाव गावाच्या निर्णयावरून दिसत आहे.

दापोली तालुक्यात हजारो एकर वडिलोपार्जित जागा ही शेतकयांनी परप्रांतीयांना विकल्या आहेत. गाव शेतकऱ्यांच्या जागेत रो हाऊस आणि बंगलो उभे राहत आहेत. मात्र, कवडी मोलात विकलेल्या जागेत उभे राहिलेले हे नंदनवन पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत, या शेतकऱ्यांच्या जागा विक्रीत स्थानिक दलाल देखील पुढे असून ही जागा तुमची नाही, दुसऱ्याचे नावावर आहे. मूळ मालक जागा झाला तर तुम्हाला काही मिळणार नाही अशी भीती दाखवून शेतकऱ्यांना सरळ सरळ लुबाडले जात आहे. त्यामुळे भीतीपोटी शेतकरी कवडी मोलात जागा दलालांच्या घशात घालत आहेत, तर याच जागा दलाल कोट्यवधी रुपयात विकासक यांना विकत आहे. त्यामुळे हे दलाल गडगंज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतक-यांनी घरालगतच्या जागा या विकल्या आहेत. तर जागा खरेदीदार आत्ता वरचढ होऊ लागले आहेत. याचा त्रास आता गावाला होत आहे, तर यावरून आता स्थानिक विरद्ध जागा खरेदी करणारे असा वाद पोलिस स्थानकापर्यंत पोहोचू लागला आहे. वडिलोपार्जित जागा या आपल्या पूर्वजांनी मिळवलेली व आपल्यासाठी राखून ठेवलेली संपत्ती आहे. त्या जागेत श्रम करून उत्पन्न घ्या, पण कवडीमोलात जागा विकू नका, असा सल्ला कोंढे माजी सरपंच राजाराम घोडेराव यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:32 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow