शिष्यवृत्तीसाठी अर्ज नोंदणी, नूतनीकरणासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

May 25, 2024 - 17:15
May 25, 2024 - 17:16
 0
शिष्यवृत्तीसाठी अर्ज नोंदणी, नूतनीकरणासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाच्या नूतनीकरणासाठी १५ जूनअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.

गतवर्षाच्या २०२२-२३ करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलअखेर आदेशित केले होते; मात्र महाविद्यालयातील विद्याथ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त होत असल्याने अनुसूचित जाती, इमा विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी २०२३-२४ करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी तसेच २०२२-२३ करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शासनाने १५ जूनअखेर मुदतवाढ दिली आहे.

ही प्रक्रिया आपले सरकार संकेतस्थळावर सुरू आहे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील, असे पत्रकात नमूद आहे.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत प्राचार्यांनी कार्यवाही करावी. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow